Balasaheb Thackeray Jayanti 2025: व्यंगचित्रकार ते लाडके हिंदुहृदयसम्राट...! बाळासाहेबांच्या 'या' ग्रेट गोष्टी माहित आहेत का?

अत्यंत कडक अन् रोखठोक स्वभावाच्या बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द अत्यंत वादळी राहिली. सामान्य व्यंगचित्रकार ते एका इशाऱ्यावर मुंबई थांबवण्याचं सामर्थ्य असलेले साहेब असा त्यांचा प्रवास राहिला.

जाहिरात
Read Time: 3 mins

Balasaheb Thackeray Jayanti 2025:  आपल्या कुंचल्यांच्या फटकाऱ्याने आणि भाषणातील शाब्दिक बाणाने विरोधकांना घायाळ करणारे अन् प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटवणारे अखंड भारताचे लाडके वक्ते, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं असे  सर्वांचे लाडके हिंदुहृदयसम्राट म्हणू बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. आज 23 जानेवारी, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिक, राजकीय नेते बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूला अनेक वर्ष लोटली तरी आजही  देशाच्या अन् राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या तोंडातून सुटलेला शब्द हा भात्यातील बाणाप्रमाणे असतो, तो एकदा सुटला की सुटला, अशा अत्यंत कडक अन् रोखठोक स्वभावाच्या बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द अत्यंत वादळी राहिली. सामान्य व्यंगचित्रकार ते एका इशाऱ्यावर मुंबई थांबवण्याचं सामर्थ्य असलेले साहेब असा त्यांचा प्रवास राहिला. जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी! 

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1947 रोजी झाला. सुरुवातीला त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र काही काळाने त्यांनी नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले. या साप्ताहिकातून त्यांनी मुंबईमधील परप्रांतियांच्या वाढत्या आक्रमणावर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली. याच प्रेरणेतून त्यांनी 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना हा पक्ष नसून शिवाजी महाराजांची सेना आहे अशी गर्जना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी चार दशके मुंबईसह देशाच्या राजकारणावर हुकूमत गाजवली.

( नक्की वाचा : जोडप्यांमध्ये वेगानं लोकप्रिय होत असलेला Sleep Divorce काय आहे? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो? )

बाळासाहेब ठाकरेंच्या या ग्रेट गोष्टी माहित आहेत का? 


1. आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी बाळ ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. 1950 च्या त्यांनी काढलेली व्यंगचित्रे ही टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत  प्रकाशित व्हायची.

Advertisement

2. बाळासाहेब ठाकरेंची भाषणे म्हणजे शिवसैनिकांसाठी जणू पर्वणी असायची. ते एखाद्याच्या विरोधात बोलायला लागले की शत्रूसारखेच वाटायचे, मात्र जेव्हा ते एखाद्याची स्तुती करत तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठा कोणी मित्रच नाही, असा भाव तयार व्हायचा.

3. बाळासाहेब ठाकरे यांना चांदीच्या सिंहासनावर बसण्याची आवड होती. त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर फक्त त्यांचे शिवसैनिकच नव्हेतर विरोधकही गर्दी करायचे. 

4. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेतशिवाजी पार्कमध्ये नारळ फोडून शिवसेनेची स्थापना केली. 

5. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांची खासियत म्हणजे हातात कोणताही कागद न घेता ते बोलायचे. त्यांची तोफ अशी धडायची की विरोधक घायाळ अन् त्यांना ऐकणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध व्हायचा. 

Advertisement

6. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणासह मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातही दबदबा होता. सर्वात महत्त्वांच म्हणजे हिंदुहृदयसम्राट कधीही स्वतः कुणाला भेटायला जात नव्हते, त्यांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर मातोश्रीवर गर्दी करायचे. 

7. बाळासाहेब ठाकरे हे असे व्यक्तिमत्व होते, जे कधीही कोणाला भेटायला गेले नाहीत. ज्याला भेटायचे आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचायचा. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर स्वतः त्यांच्या मुंबईतील (Mumbai) मातोश्री निवासस्थानी पोहोचत असतं.

Advertisement

8. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांचे छंदही विशेष होते. प्रत्येकाने छंद जोपासावेत असं ते म्हणायचे.  त्यांना सिगार आणि व्हाईट वाईनची आवड होती. त्यांच्या अनेक मुलाखती आणि फोटोंमध्ये त्यांच्या हातात सिगार दिसतो.

9. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढविण्यास 6 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका आणि त्यांचा आदेश हा अंतिम मानला जायचा. 

10. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळ ठाकरे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यादिवशी संपूर्ण मुंबई बंद होती आणि जवळपास 5 लाख लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली.