Shivsena Melava: 'बाळासाहेबांचा आवाज पुन्हा घुमला.. AI भाषणावर शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय?

Balasaheb Thackeray AI Speech Nashik: AI द्वारे झालेले भाषण ऐकून वर्धा जिल्ह्यातील शिवसैनिकांत मोठा उत्साह पाहायला मिळाला.बाळासाहेब यांच्या या खास आवाजावर आता शिवसैनिकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश बंगाळे, वर्धा: शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे निर्धार शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण.. आज नाशिकमध्ये या निर्धार शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणामधून शिवसैनिकांना साद घालण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातून एकनाथ शिंदे, भाजपवर जोरदार टीका केली. निर्धार सभेत बाळासाहेब ठाकरे यांचे AI द्वारे झालेले भाषण ऐकून वर्धा जिल्ह्यातील शिवसैनिकांत मोठा उत्साह पाहायला मिळाला.बाळासाहेब यांच्या या खास आवाजावर आता शिवसैनिकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले शिवसैनिक?

आज नाशिकमध्ये बाळासाहेबांचा आवाज ऐकल्यावर सर्व शिवप्रेमींचे रक्त गरम झालेले आहे. सर्व शिवसैनिकांना असं आढळून येत आहे की बाळासाहेब ठाकरेच पुन्हा जमिनीवर आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आमच्या पाठिशी आहेत. म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन ज्यांनी गद्दारी केली त्या 40 लांडगे, 13 कोल्ह्यांना मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. असं हे शिवसैनिक म्हणालेत. 

भाजपची  टीका..

दरम्यान, "आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो," असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर जोरदार टीका केली आहे. 

( नक्की वाचा : Bengal Violence : '... म्हणून बंगालमध्ये दंगल घडवली जात आहे', मिथुन चक्रवर्तींचा थेट हल्ला )

"मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली,वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्‍या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले. वक्फच्या विरोधात मतदान केले.  राममंदिराला सातत्याने विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणार्‍याला विरोध करणार्‍यांना पाठिंबा दिला. त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती.... असे  चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.