गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांसह 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जण सुदैवाने या हल्ल्यातून बचावले. अशातच या हल्ल्यावेळीच जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या कुडाळच्या महिलांसोबत हल्ल्याच्या आधी धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातील प्रीती कदम या आपल्या घरातील तीन महिलांसह एकूण चार महिला ह्या कश्मीर टूरसाठी गेल्या होत्या. 22 एप्रिलच्या हल्ल्याच्या दोन ते चार दिवस आधी प्रीती कदम आपल्या घरातील अन्य तीन महिलांसह काश्मीर दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी पहलगाम येथे गेल्यानंतर तेथील टॅक्सी चालकाने त्यांना अत्यंत अतिरेक्याप्रमाणे वागणूक दिली. त्यांचे सामान रस्त्यातच फेकून देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले आणि वाटेतच सोडून दिले.
त्याचं बोलणं एका ड्रायव्हरसारखं नव्हत तर एका अतिरेक्यांसारख होता. असं प्रिती कदम यांचं म्हणणं आहे. "आपको अगर कोई गोली मार दे तो हमे कुछ भी फरक नही पडता, मै पोलीस और एसआरपी लोगो की नफरत करता हु! हमे सिर्फ पैसे से मतलब है! अशा प्रकारचे धमकी त्याने दिली. शेवटी असाहाय्य झालेल्या त्या चार महिलांनी आपल बरं वाईट होईल या भितीने त्याला पैसे दिले. तेथेच त्यांना उतरून घातल्यावर दुसऱ्या टॅक्सीची वाट बघत थांबावं लागले.
मुंबईत गेल्यानंतर 22 एप्रिलला जो कश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आणि प्रीती कदम यांना धक्का बसला. दरम्यान, या घटनेनंतर प्रिती कदम यांची फॅमिली पूर्ण घाबरलेली असून त्या कुडाळ येथील असल्या तरी सध्या त्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. तसेच यापुढे काश्मीर पर्यटनाला कधीही जाणार नसल्याचा निर्णयच त्यांनी घेतला आहे. त्या टॅक्सी चालकाचा फोटो त्यांनी घेतला असून पोलीस यंत्रणेने आणि संरक्षण यंत्रणेने यांनी याची दखल घेत त्या टॅक्सी चालकाला ताब्यात घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ट्रेडिंग बातमी - MHADA Lottery : मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी