ओंकार कुलकर्णी, धाराशिव: महाराष्ट्र कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदीर विकास आराखड्याचे काम करताना तडा गेल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केला असून पुरातत्व विभाग, तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आणि महंता विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर विकास आराखड्यासाठी मूर्तीचे स्थलांतर करत असताना हा प्रकार घडण्याचा आरोप पुजारी मंडळाकडून करण्यात आला. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवरr कारवाई करावी अशी मागणी मंडळाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत मंदिर देवस्थानचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. मंदिरातील उपदेवतांच्या मूर्तीच चुकीच्या पद्धतीने स्थलांतर करण्यात आलं. त्यामुळेच उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. यामध्ये मंदिराचे विश्वस्त, महंत तसेच पुरातत्त्व विभाग दोषी असल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुजारी मंडळाने केली आहे.
नक्की वाचा - Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी
मंदिर कार्यालयात मद्यपान करुन तोडफोड:
दुसरीकडे, तुळजापूर मंदिर संस्थान कार्यालयात मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पुजाऱ्यावर तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत, गोंधळ घालत तोडफोड केली.
यावर मंदिर संस्थान कडून त्यांच्यावर तुळजापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी अनुप कदम यांनी 13 एप्रिल 2025 रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश करत मंदिर संस्थान मधील अधिकाऱ्यांशी वाद घातला होता. याच अनुषंगाने मंदिर संस्थान कडून 12 मे रोजी कदम यांना नोटीस बजावण्यात आली होती यावर संतप्त होत पुजाऱ्याकडून तोडफोड केल्याने पुजारी कदम यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.