Bhayandar News: हलगर्जीपणाचा कळस! रुग्णालयात उंदराने महिलेला कुरतडले, भाईंदरमधील घटना

उंदराने त्यांच्या हाताला अक्षरशः कुरतडण्यास सुरुवात केली. ​सकाळी ६ वाजता जेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आयसीयूमध्ये गेले, तेव्हा त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 Bhayandar News:  भाईंदर पश्चिमे येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेला उंदराने कुरतडल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या अतिदक्षता विभागात सामान्य माणसांना प्रवेशासाठी कडक निर्बंध असतात, तिथे उंदरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आयसीयूमध्ये उंदराचा उच्छाद 

सुहासिनी माठेकर (वय ८९ वर्ष) असे या दुर्दैवी वृद्ध महिलेचे नाव आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काल रात्रीच्या सुमारास  एका उंदराने त्यांच्या हाताला अक्षरशः कुरतडण्यास सुरुवात केली. ​सकाळी ६ वाजता जेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आयसीयूमध्ये गेले, तेव्हा त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. 

Advertisement

Chandrapur News: नवस फेडायला गेले अन् भयंकर घडलं! सातबहिणी डोंगरावर थरार; 3 वर्षांच्या चिमुरडीसह चौघे जखमी

रुग्णालय प्रशासनावर संताप 

नातेवाईक जवळ पोहोचताच हाताला कुरतडणारा उंदीर पळून गेला, मात्र तोपर्यंत वृद्धेच्या हाताला जखम झाली होती. अतिदक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि परिचारिका कर्तव्यावर असतात. असे असतानाही रात्रभर एका वृद्ध महिलेला उंदीर कुरतडत होता आणि याची साधी दखलही तेथील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही, याबद्दल नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

"जर आयसीयूमध्ये रुग्ण सुरक्षित नसतील, तर मग उपचार घ्यायचे कुठे?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या घटनेने रुग्णालयातील अस्वच्छता आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे पितळ उघडे पडले आहे. ​स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Nagpur Crime: मुलींच्या कराटे संघासोबत ट्रेनमध्ये भयंकर प्रकार! असहाय्य मुलींचा आक्रोश, रेल्वे पोलिसांवर संताप