सिद्धांत विठ्ठल पाटील हा तरूण अमेरिकेत गायब झाला आहे. मुळचा जळगावचा असलेला हा तरूण पुण्यात स्थायिक झाला आहे. अमेरिकेतील मोन्टाना ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये तो सहा जुलैला फिरायला गेला होता. त्यावेळी त्याच्या बरोबर त्याचे मित्र ही होते. त्यांचा गिर्यारोहणाचा प्लॅनही होता. त्यानुसार ते गिर्यारोहणासाठी निघालेही होते. पण गिर्यारोहण करत असतानाच हिमस्खलन झाले. त्यावेळी त्याचा खडकावरून पाय घसरला. तो खाली कोसळला. त्यानंतर तो कुठेही दिसला नाही. या घटनेला आता जवळपास 12 दिवस झाले आहेत. पण त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमेरिकेतील स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनांकडून सिद्धार्थचा शोध सुरू आहे. तो कोसळल्यानंतर एका नदीत पडला. त्यानदीचा प्रवाह प्रचंड होता. त्यामुळे त्याला शोधण्यास स्थानिक प्रशासनाला अडचण येत आहे. त्यामुळे बारा दिवस झाले तरी त्याचा काही पत्ता लागला नाही. या घटनेमुळे त्याचे मित्र आणि कुटुंबीय चिंतेत सापडले आहे. सिद्धार्थ हा 2020 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलीसमधून एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. 2023 मध्ये तो कॅडेन्स मध्ये तंत्रज्ञ म्हणून रुजू झाला होता. सिद्धांत अवघ्या 26 वर्षाचा आहे. त्याचे संपुर्ण कुटुंब चिंतेत असून ते भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोल्हापुरात कलम 163 लागू, 'या' गोष्टी करण्यावर आलीय बंदी
सिद्धांत हा जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी येथील मूळ रहिवासी आहे. सद्यस्थितीत पुण्यात वास्तव्यास होता. 26 वर्षीय तंत्रज्ञ सिद्धांत विठ्ठल पाटील हा बेपत्ता झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेरिकन प्रशासनाने त्याला शोधण्यासाठी संपुर्ण ताकद पणाला लावली आहे. पण तो भेटत नसल्याने तेही हताश झाले आहेत. तर सिंद्धांतच्या कुटुंबीयांना तो वाचेल अशी आशा आहे. त्यासाठी ते देवाकडे प्रार्थनाही करत आहे.