Anganewadi Jatra News: भराडी देवीने कौल दिला! आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली

Sindhudurg Anganewadi Jatra News: यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरु दळवी, सिंधुदुर्ग:

Anganewadi Jatra Date: प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देवीने कौल दिला, आंगणेवाडी यात्रेचा दिवस ठरला

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो.

लाखो भाविकांना केंद्रबिंदु मानुन भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.

Ramee Group of Hotels : हॉटेल वर्तुळात खळबळ; दादरमधील प्रसिद्ध हॉटेलवर आयकर विभागाकडून छापेमारी

देवस्थानकडून जोरदार तयारी...

आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागणार आहे. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते.

Advertisement

जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. मंदिरामध्ये कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

Trending News: संसदेत थेट कुत्र्याला घेवून खासदारांची एन्ट्री, कारण सांगताना थेट नियमांवर बोट