Ujani Dam Water Level: उजनी धरण 62 टक्के भरलं! पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासन अलर्ट

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, पुणे: राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे सोलापूर सह नगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण 62 पूर्णांक 16 टक्के भरलं आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घातल्यावर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 58 हजार 585 क्युसेक ने आवक येत आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या उजनी धरणात एकूण 96 पूर्णांक 96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. 

Satara Rain News : सातारकरांची पाण्याची चिंता मिटली; कास धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो

तब्बल 123 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच असणार हे उजनी धरण यावर्षी 18 एप्रिल 2025 रोजी मृत पाणी साठ्यामध्ये गेलं होतं. यावर्षी धरण हे वजा 12 पूर्णांक 30 टीएमसी इतकं मृत पाणी साठ्यात गेलं होतं. मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आलं.

21 मे रोजी उजनी धरण हे वजा 12 पूर्णांक 30 टीएमसी इतकं होते. 27 मे 2025 रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरण हे मृत पाणी साठ्या मधून प्लसमध्ये आले. त्यावेळी उजनी धरणात 63 टीएमसी इतका पाणीसाठा होता.आज 20 जून 2025 रोजी उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 96 पूर्णांक 96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचा वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच उजनी धरण हे 100 टक्के क्षमतेने भरणार आहे.

Satara: महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी 19 ऑगस्टपर्यंत बंद, सातारा जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

दरम्यान, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्रात सुरू असलेला 8734 क्युसेक विसर्ग रात्री 9.30 वाजतापासून 15,000 क्युसेक इतका करण्यात येत आहे. पुणे महापालिका, विभागीय आयुक्त अशा सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. जलसंपदा विभाग सर्व यंत्रणांशी समन्वय ठेऊन आहे. वारकर्‍यांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

Advertisement