Video: संतापलेल्या विद्यार्थ्यांनी उशिरा येणाऱ्या शिक्षकाला वर्गातच कोंडून ठेवलं, बाहेरून कुलूप लावलं अन्..

छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
School Students Viral Video
मुंबई:

मोसिन शेख, प्रतिनिधी

School Student Locked Teacher Video :  छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. सतत गैरहजर आणि शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी चांगलाच धडा शिकवला. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी बेजबाबदार शिक्षकाविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली. वेळेवर शाळेत न येणाऱ्या आणि तास न घेणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी वर्गातच कोंडून ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं. हा भन्नाट प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत शाळेच्या आवारात जमा झाले. यावेळी पालकांनी शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

त्या शाळेत नेमकं काय घडलं?

शिक्षकाच्या सततच्या गैरहजेरीमुळे अभ्यासाचं मोठं नुकसान होत आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.येथील एका पालकाने माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, या शाळेत तीन शिक्षक होते. पण आता सध्या एकच शिक्षक आहे. या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत.दरम्यान, व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, उशिरा येणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थी खूप नाराज आहेत.

नक्की वाचा >> Viral Video : आरारारारा! चाहत्यांना 'AKON'चं इतकं वेड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सर्वात लोकप्रिय सिंगरची पँटच खेचली

इथे पाहा शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हायरल व्हिडीओ

शिक्षणाचं नुकसान होत असल्याने या विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या शिक्षकाला वर्गातच कोंडून ठेवलं. इतकच नाही, तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेरच्या गेटलाही कुलूप लावल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

विद्यार्थ्यांनी म्हटलंय की, शिक्षक आम्हाला फक्त वाचून शिकवतात. त्यामुळे आम्हाला काहीच समजत नाही. आम्ही शाळेत जात नाही. आम्ही घरीच जातो, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. 

Advertisement