संकेत कुलकर्णी, माढा: 'आमचं घड्याळ चिन्ह चोरीला गेलं आहे. पण पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली आमचं चिन्ह न्या प्रविष्ठ आहे, असं लिहायला लागतंय, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर बोचरी टीका केली होती. जयंत पाटील यांच्या या टिकेला आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सुनील तटकरेंचा पलटवार
माढा मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मिनल साठे यांच्या प्रचारार्थ सुनील तटकरे यांची जाहीर सभा पार पडली.या सभेआधी सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या घड्याळ चिन्हावरील आरोपाला सडेतोड उत्तर दिले. 1999 सालापासून जयंतराव निर्वाचित झाले त्या चिन्हाबद्दल त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जयंतरावांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. मुळात त्यांना घड्याळ चिन्हाची एवढी भिती का वाटावी? ज्यांना लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त झाला आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो अशी दिवास्वप्न पडायला लागली. त्यांना घड्याळ चिन्हाचे एवढं भय वाटतंय. कारण जयंतराव किती आतल्या गाठीचे आहेत. मनात एक आणि पोटात एक.. असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला.
नक्की वाचा: शिवसैनिकाची बोटे छाटली, ठाकरेंनी त्यालाच स्टेजवर आणलं, पुढे काय झालं?
काय म्हणाले होते जयंत पाटील?
उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना जयंत पाटील यांनी घड्याळ चिन्हावरुन टीका केली होती. आमचं घड्याळ चिन्ह चोरीला गेलं आहे.पण,पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ'आहे. ऑस्ट्रेलियात, चीन, पाकिस्तानमध्ये जावा, पण अशी नौबत कोणत्याच पक्षावर आली नाही. आमचं हे चिन्ह आहे, पण न्यायप्रविष्ठ आहे हे सांगावं लागतं आहे. असं ते म्हणाले होते.
ट्रेंडिग बातमी: 'लबाड लांडग्यांचा कळप', CM शिंदेंचा मविआवर निशाणा; PM मोदींनी काँग्रेसला झोडपले!