Swargate Bus Rape Case: पुण्यातून अपहरण अन् बोपदेव घाटात बेदम मारहाण; दत्ता गाडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला

Pune Swargate Bus Rape Case: या हल्ल्यामध्ये साहिल डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शहरातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. स्वारगेट स्थानकातील या अत्याचारप्रकरणी शिरुरमधील दत्ता गाडे याला अटक करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. दत्ता गाडे याचे वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप साहिल डोंगरे यांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये साहिल डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शहरातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साहिल डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी संध्याकाळी हडपसर येथुन डोंगरे यांचे अपहरण करुन बोपदेव घाटात नेण्यात आले. दिवे घाटात त्यांना मारहाण करुन सोडुन देण्यात आले.  मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. साहिल डोंगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सध्या त्यांच्यावर शहरातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे. दत्ता गाडेचे वकील वाजीद खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. एका वकिलावर केलेला हा प्राणघातक हल्ला निषेधार्थ असल्याचे वाजीद खान यांनी म्हटले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी पहाटे स्वारगेट बसस्थानक परिसरात फलटणाला निघालेल्या तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेत अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला दोन दिवसांनी शिरुर तालुक्यातील त्याच्या गावातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला 12 दिवसांची कोठडी सुनावली आहे.