Swargate Rape Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणात कारवाईचा दणका! 4 अधिकारी निलंबित; घटनेचा संपूर्ण अहवाल समोर

संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर घटनेची चौकशी करण्यात आली आणि अहवाल सादर करण्यात आला आहे, असे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: पुण्यामधील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. भल्यापहाटे एकट्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात आरोपी आणि पिडितेची आधीपासून ओळख असल्याचा दावा केल्यानंतर याप्रकरणी नवा ट्वीस्ट निर्माण झाला होता. आता या घटनेचा संपूर्ण अहवाल समोर आला असून प्रताप सरनाईक यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती अधिवेशनामध्ये दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वारगेट बस स्थानकावर 16 फेब्रुवारी रोजी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर घटनेची चौकशी करण्यात आली आणि अहवाल सादर करण्यात आला आहे, असे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्याने स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुख यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीच्या अहवालानुसार, एसटी महामंडळाने बस स्थानकावर कार्यरत असलेल्या 22 सुरक्षारक्षकांना तातडीने बदली करण्याचा निर्णय घेतला. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा मंडळाला देण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग बातमी - UP News : लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरा-नवरीसोबत भयंकर घडलं; सकाळी बेडरुममधील दृश्य पाहून सगळेच हादरले

या प्रकरणात हलगर्जीपणा आढळल्याने वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री. जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक श्री. सुनील येळे, तसेच सहायक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढगे या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, यापुढे महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असेही निवेदन परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी केले.