Tadoba Andhari Tiger Reserve Safari Expensive Hike: पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी. राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी महागली आहे. प्रकल्पातील बफर आणि कोअर झोनमध्ये सफारी करणाऱ्या पर्यटकांना हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. काय आहेत नवीन तिकीट दर? जाणून घ्या सविस्तर..
Tadoba News: पर्यटकांसाठी महत्त्वाचं! 1 जुलैपासून ताडोबा जंगल सफारी बंद
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रात पर्यटकांसाठी सफारी १ जुलैपासून बंद झाली आहे. मात्र बफर झोनमध्ये मान्सून पर्यटन सुरू राहणार आहे. नव्या रचनेनुसार, कोअर झोनमध्ये एक सफारी आता आठवड्याच्या इतर दिवशी 8 हजार 800 रुपये, आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 12 हजार 800 असेल. बुकिंग 60 ते 120 दिवस आधी करावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे सफारीच्या एक ते 59 दिवसांपर्यंत बुकिंग केल्यास आठवड्याच्या दिवशी 5 हजार 800 आणि आठवड्याच्या शेवटी 6 हजार 800 खर्च येईल. 1 ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी कोअर झोनमधील सफारी सुरू होणार असल्याने नवीन हंगामापासून हे दर लागू होतील. बफर झोन मधील सफारीदेखील महागली आहे. ही वाढ 1 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. आठवड्याच्या दिवशी शुल्क सहा हजार रुपये आणि आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सात हजार रुपये असणार आहे.
दरम्यान, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्र पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पावसाळ्यामुळे1 जुलैपासून 3 महिने ही बंदी असेल. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये शिवाय पावसामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांनी पर्यटन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कोअर झोनमधील क्षेत्र पर्यटनाकरीता बंद ठेवण्यात येते. मात्र बफर क्षेत्रात मान्सून पर्यटन सुरू ठेवले जाणार आहे.