हायकोर्टाच्या लिपीक पदाच्या परीक्षेत गोंधळ, संभाजीनगरसह कल्याणमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपीक पदाच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचं उघडकीस आलं आहे.परीक्षा केंद्रावर संगणक-किबोर्डमध्ये बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
High Court Clerk Exam News Today

High Court Clerk Exam News Today :  छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपीक पदाच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचं उघडकीस आलं आहे.परीक्षा केंद्रावर संगणक-किबोर्डमध्ये बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रातील स्क्रीन सतत चालू-बंद होत होत्या. तसच प्रत्येक विद्यार्थ्याला किबोर्डच्या समस्येला सामोरं जावं लागत होतं,अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिलीय. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी याची गंभीर दखल घेत सरकार विरोधात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतली. 

यावेळी अभिजित दीपके म्हणाले,"ऑनलाईन परीक्षा होती, तर आधीच सर्व्हर आणि किबोर्ड लावायचे.यांना अक्कल नव्हती का? सरकारला स्वत:ला अक्कल नाही आणि ते विद्यार्थ्यांची अक्कल काढतात. हायकोर्टाची लिपीक परीक्षा पुन्हा झाली पाहिजे,अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे"

Advertisement

कल्याणच्या एपीएमसीतही विद्यार्थ्यांचा संताप 

परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण एपीएमसीत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जवळपास  500 उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.कल्याण एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावरही मोठा गोंधळ उडाला आहे.

नक्की वाचा >> स्वातंत्र्यदिनी धारावीतील विद्यार्थ्यांनी रंगवलं धारावीचं भविष्यचित्र! ‘मेरे सपनो की धारावी' उपक्रम चर्चेत

संगणक आणि कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड,परीक्षा केंद्रात जुनी व धुळखात पडलेली यंत्रणा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत समस्या न सुटल्याने 400 ते 500 विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला.पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची आंदोलनस्थळी धाव घेतली. दरम्यान, या परीक्षा नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून उमेदवारांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.