TMC Recruitment: ठाणे महापालिकेत नोकरीची संधी! 'या' विभागात 601 पदांची जम्बो भरती; वाचा सर्व डिटेल्स

अभियांत्रिकी विभागातील तब्बल ६०१ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामुळे अग्निशमन दलाची ताकद वाढणार असून शहराच्या आपत्कालीन सेवेला नवीन गती मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane Mahanagar Palika Bharti 2026:  सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण-तरुणींसाठी ठाणे महानगरपालिकेकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागात रिक्त असलेल्या एकूण 601 जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी या भरतीची घोषणा केली असून, इच्छुक उमेदवारांना तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

Vashi APMC News: कचऱ्यातील सडलेल्या भाज्या मुंबईकरांच्या ताटात? वाशी मार्केटमधील VIDEO ने खळबळ

ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गावदेवी मंडई येथील दुर्घटनेनंतर अग्निशमन दलातील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आता पालिकेच्या महासभेत झालेल्या निर्णयानुसार, अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील तब्बल ६०१ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामुळे अग्निशमन दलाची ताकद वाढणार असून शहराच्या आपत्कालीन सेवेला नवीन गती मिळणार आहे.

Advertisement

Thane Municipal Corporation Official Website: ठाणे महापालिका अधिकृत संकेस्थळ- https://thanecity.gov.in/tmc/

​सध्या ठाणे अग्निशमन दलात मनुष्यबळाची कमतरता असून, ८३५ मंजूर पदांच्या तुलनेत केवळ ३२५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या ६०१ नवीन जागा भरल्यामुळे नोकरीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. ही भरती टीसीएस (TCS) कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने केली जाणार आहे, ज्यामुळे प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरतीची सविस्तर जाहिरात पुढील दोन दिवसांत अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Mumbai Rain: मुंबईत मध्यरात्री पावसाची बॅटिंग! घरात पाणी शिरलं, रस्ते तुंबले; कुठे कुठे सरी बरसल्या?