रिझवान शेख, ठाणे:
Thane Water Cut News: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे शहरात 19 डिसेंबरपर्यंत 50 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ही पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यात 50 टक्के पाणीकपात!
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मि.मी व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी नादुरूस्त झाली होती, सदर जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Winter Fog Driving Tips: दाट धुक्यात सुरक्षितपणे गाडी कशी चालवावी? 'या' 5 गोष्टीकडे लक्ष द्या
परंतु या कामास आणखी 4 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाणे शहरात 19 डिसेंबर 2025 पर्यत 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून 4 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन...
परिणामी, ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी दि. 19.12.2015 पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.
माकडं कशाला घाबरतात? त्यांना पळवून लावायचं असेल तर ही खास ट्रिक लगेच वापरा