Bhandara News: पंधरा दिवसात 2 बळी, मुलांच्या शाळा बंद, घराबाहेर पडणे मुश्किल.. भंडाऱ्यात काय घडतंय?

परिसरातील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांपेवाडा, उमरझरी, आमगाव तिन्ही गावात तिघांवर हल्ला चढविला यात दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

अभय भुते, भंडारा:

Bhandara News:  भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असून गेल्या १५  दिवसांत तीन जणांवर हल्ला केला असुन यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत, 15 दिवसात दोघांचा मृत्यू! 

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. अभयारण्याला लागून असलेल्या गावात नेहमी जंगली प्राण्यांचा वावर असतो. 19 मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंत मेश्राम मोहफुल संकलन करण्यासाठी शेतावर गेला होता याला वाघाने ठार केलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले होते. गावकऱ्यांची भीती संपत नाही तर लगेच 27 मार्चला जवळच असलेल्या उमरझरी येथील माया सोनवणे या महिलेवर वाघाने हल्ला केला.

Advertisement

Nashik News: दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

महिलेने आरडाओरड केली असता गावकरी धावून आले पण महिला गंभीर जखमी झाली होती. तर तिसरी घटना आमगाव येथे घडली छाया मुंगमोडे या महिलेवर देखील वाघाने हल्ला केला. दोन्ही महिलांवर नागपूर येथे उपचार सुरू असताना माया सोनवणे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर छाया मुंगमोडे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. परिसरातील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांपेवाडा, उमरझरी, आमगाव तिन्ही गावात तिघांवर हल्ला चढविला यात दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.

इतकाच नाही तर मागील 15 दिवसापासून शेतकरी शेतीवर देखील फिरकले नाही. ग्रामीण भाग असल्याने उमरझरी येथील मुले 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांपेवाडा गावात सायकलने शिक्षणासाठी जात होते. मात्र भीतीपोटी आई वडिलांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायला मनाई केली  आहे... तसेच येणाऱ्या तीन दिवसात वनविभागाने वाघाला जेरबंद केलं नाही तर मोठ आंदोलन करून वनविभागाच्या संपूर्ण चौक्यांवर गावकरी ताबा घेतील अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

वनविभागाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप 

स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वाघाचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावणे, पिंजरे आणि गस्त वाढविले आहे.. 46 ट्रॅप कॅमेरे, 4 ड्रोन, 180 कर्मचारी जंगलात गस्त घालून वाघाला जेरबंद करण्याच्या तयारीत आहेत. मात्र वाघ प्रत्येक दिवशी आपली जागा बदलवत आहे.

Nashik Crime: ऑफिसमधून टॅब चोरल्याची तक्रार, फिर्यादीच झाला आरोपी, 121 नको ते व्हिडिओ सापडले

तसेच जंगल घनदाट असल्याने वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अडचणी येत आहेत. तरी पण डॉट मारून वाघाला जेरबंद करण्यासाठी शूटर जंगलात ठाण मांडून बसले आहेत. लवकर या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात येईल असे साकोली तालुक्यात वाघाच्या वाढत्या हालचालीमुळे गावकरी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. 15 दिवसात दोन जणांचा बळी गेल्याने शेतकरी शेतात काम करीत नाही आहेत.. वनविभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Advertisement
Topics mentioned in this article