महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत आहे. देशात सर्वात जास्त वाघ महाराष्ट्रातच आहेत. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात एकूण 650 वाघ आहेत. तर राज्यात पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघांची संख्या 19 आहे. अशा स्थिती महाराष्ट्रातील वाघ आता राजस्थानमध्ये जाणार आहेत. एकूण चार वाघ महाराष्ट्रातून पाठवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील वाघ राजस्थानच्या जंगलात वावरतील. मात्र या बदल्यात राजस्थानही महाराष्ट्राला काही पक्षी देणार आहे. मात्र हे पक्षी काही साधेसुधे नाहीत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रातील वाघ राजस्थानला पाठविण्याची प्रक्रिया महाराष्ट्राच्या बाजूने पूर्ण झाली आहे. राजस्थान सरकारकडून नॅशनल कन्झर्व्हेशन टायगर अथॉरिटीची प्रक्रिया बाकी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून वाघ राजस्थानला पाठवले जातील. राजस्थानला एकूण चार वाघ पाठवायचे आहेत. महाराष्ट्रात सध्या परिस्थितीत 650 वाघ आहेत. दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत आहे. वाघ संवर्धनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी फायद्याचे ठरत आहेत. अशा वेळी आता महाराष्ट्र अन्य राज्यांना वाघ देत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले
जरी महाराष्ट्र राजस्थानला 3 वाघ देत असले तरी त्या बदल्यात राज्यातून लुप्त होत चाललेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या प्रजाती घेतल्या जाणार आहेत. यामध्ये माळढोक, सारस आणि गिधाड यांचा समावेश आहे. राज्यात माळढोक पक्षी हा जवळपास नाहीसा झाला आहे. तो दुर्मिळ होवून बसला आहे. अशा स्थितीत राजस्थान आपल्याला माळढोक पक्षी देणार आहे.