Nagpur News: मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
विधानपरिषदेतील प्रश्नाला उत्तर...
या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात विधान परिषदेत उपस्थित लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर, परिणय फुके आणि चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.
Pune News: महसूल विभागाचा दणका! 4 तहसीलदार, 2 तलाठ्यांसह 10 जणांचे निलंबन, कारण काय?
महामार्गावर 22 ठिकाणी इंधन स्थानके, स्नॅक्स सेंटर
राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, नागपूर – मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याला समृद्ध करणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. तसेच या महामार्गावर विविध पार्क उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर सध्या २२ ठिकाणी इंधन स्थानके व स्नॅक्स सेंटर स्वच्छतागृहासह कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून २१ ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. महामार्गावर सात ठिकाणी तात्पुरत्या हॉटेलची व्यवस्था करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी महामार्ग सुविधा विकसित करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.