ईव्हीएम बंदोबस्तात गैरहजर राहणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

Satara EVM: ईव्हीएम बंदोबस्तामध्ये गैरहजर राहणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

ईव्हीएम बंदोबस्तामध्ये गैरहजर राहणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे मतमोजणी केंद्र हे एमआयडीसीमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा अनपेक्षित प्रकार घडू नये, याकरिता परिसरात सातारा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी कुचराई केल्याचे उघड झाले. 

(नक्की वाचा: लोकसभा एग्झिट पोलनंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 2 हजार तर निफ्टीचा नवा विक्रम)

या बंदोबस्ताचे अपडेट्स साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख घेत आहेत. यामध्ये जर कोणीही कर्तव्यात कसूर केली तर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यामध्ये मागे पुढे पाहिले जात नाही. याचेच उदाहरण म्हणजे सातारा शहरचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश उमाप आणि महिला पोलीस उपनिरीक्षक के. बी. म्हस्के या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत.

(नक्की वाचा: Lok Sabha Result : पंतप्रधान मोदी की राहुल गांधी, देशाची गॅरेंटी कुणाला? उद्या होणार फैसला)

त्याचबरोबर चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर केवळ स्वाक्षरी करणे बाकी आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये तैनात असलेले पोलीस कर्मचारीही हलगर्जीपणा दाखवत नाहीयेत. मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. 

दरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आलेले दोन्ही पोलीस उप निरीक्षक कामावर गैरहजर राहिले होते. निवडणुकीच्या काळात कर्तव्यामध्ये कुचराई करत ड्युटीवर गैरहजर राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

Advertisement

(नक्की वाचा: अमरावतीत नवनीत राणा विरूद्ध ऑल; मोदींचा वरदहस्त राणांना यश मिळवून देईल?)

EVM बंदोबस्तात कुचराई, साताऱ्यात पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Topics mentioned in this article