Dharashiv Politics: उद्धव ठाकरेंचा झंझावाती दौरा! बंडखोर ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार

सध्या ते बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव:

Uddhav Thackeray Maharashtra Tour:  शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. टायगर ऑपेशन अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्यानंतर ठाकरेंनी नव्याने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सध्या ते बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.

Malvan News: थरकाप उडवणारा VIDEO! त्याचा जीव गेला अन् मित्र नाचत होते; स्विमिंग पूलमध्ये भयंकर घडलं!

बंडखोर ओमराजेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा 

धाराशिवचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात धाराशिव मध्ये उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. दुपारी 3.30 वाजता ठाकरे धाराशिव मध्ये येणार असुन शहरातील सिध्दाई सिद्धी मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेणार आहेत.  खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून परिचित होते. त्यांच्या पक्षांतराने अनेकांना धक्का बसला.

Advertisement

यामुळे उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांचा कसा समाचार घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून या मेळाव्यासाठी मोठी तयारी देखील करण्यात आली आहे. शहरभर उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागले असून उद्धव ठाकरे येणार आहे त्या मार्गांवर भगवे ध्वज देखील लावण्यात आलेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून संपूर्ण शहरभर बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच सोलापूर धुळे महामार्गावर देखील भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे या मेळाव्यातून काय मार्गदर्शन करतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

त्याचबरोबर बंडखोर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघातही उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच परभणीत येत आहेत. संजय जाधव यांच्यावर उद्या उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून राहणार आहे.

Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना लागणार लॉटरी; पैसाच पैसा येणार अन् भरभराट होणार