Jalgaon Politics: ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; रक्षा खडसेंसाठी धोक्याची घंटा?

उज्वल निकम यांना मंत्रिपद द्यायचं झाल्यास एका जिल्ह्यात दोन मंत्रिपद देणे सहसा अशक्य आहे. त्यामुळे ॲड. उज्वल निकम यांच्या मंत्रीपदाची चर्चा ही खडसेंसाठी चिंतेची बाब आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मंगेश जोशी, जळगाव

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड करण्यात आल्यानंतर उज्वल निकम यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र उज्वल निकम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासाठी मात्र ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर ॲड. उज्वल निकम यांची निवड झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात 3 खासदार झाले असून रक्षा खडसे यांच्याकडे केंद्रीय युवक व राज्य क्रीडामंत्री पद आहे. मात्र उज्वल निकम यांना मंत्रिपद द्यायचं झाल्यास एका जिल्ह्यात दोन मंत्रिपद देणे सहसा अशक्य आहे. त्यामुळे ॲड. उज्वल निकम यांच्या मंत्रीपदाची चर्चा ही खडसेंसाठी चिंतेची बाब आहे. 

ॲड. उज्वल निकम यांनी देशातील अनेक महत्त्वाचे खटले हाताळले असून त्यामुळे देशभरात कायदेतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 ला उत्तर मध्य मुंबईतून पुनम महाजन यांना उमेदवारी न देता भाजपकडून ॲड.उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती . मात्र काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देऊन निकमांसमोर मोठा आवाहन उभा करण्यात आलं होतं. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ॲड. उज्वल निकम यांना 16 हजार 514 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. लोकसभेतील पराभवानंतर राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती  करण्यात आली मात्र या नियुक्तीला विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र आता निकमांना राज्यसभेवर घेऊन भाजपाकडून त्यांचं पुनर्वसन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Anil Parab : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप)

देशातील अनेक महत्त्वाचे खटले निकाली काढल्यानंतर ॲड.उज्वल निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यामुळे त्यांची राष्ट्रीय प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उज्वल निकम यांच्या नावाला प्राधान्यक्रम कायम राहिला आहे. आता राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ॲड.उज्वल निकम यांची राष्ट्रीय प्रतिमा व कायद्याचा गडद अभ्यास याचा उपयोग करून घेण्यासाठी उज्वल निकम यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्या जाऊ शकतं शिवाय गिरीश महाजन व खडसे कुटुंबातील राजकीय वैर पाहता गिरीश महाजन हे देखील उज्वल निकमांच्या मंत्रिपदासाठी आग्रही राहू शकतात. 

Advertisement

उज्वल निकम यांच्या राज्यसभेवर निवडीनंतर वर्चस्वाची लढाई

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र एकनाथ खडसे यांनी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन रक्षा खडसेंची उमेदवारी खेचून आणत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे असलेले आपले वर्चस्व सिद्ध केले. एवढेच नाही तर रक्षा खडसे यांना विजयासाठी पाठबळ देऊन विजयानंतर मंत्री पदासाठी ही एकनाथ खडसेंनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावत पुन्हा एकदा भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे असलेला आपला वर्चस्व सिद्ध केलं. मात्र आता उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मंत्री पदाची चर्चा रंगली असताना रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उज्वल निकमांच्या मंत्रिपदाचा विचार झालास सुनेचे मंत्रिपद वाचवण्यासाठी एकनाथ खडसेंना वर्चस्वाची परीक्षा द्यावी लागणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Devendra Fadnavis : आधी ऑफर, नंतर भेट, अखेर फडणवीसांना उद्धव ठाकरेंकडून काय हवंय? )

मंत्रिपदाच्या जागी पक्ष संघटनेची जबाबदारी 

ॲड. उज्ज्वल निकम यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यास रक्षा खडसे यांचे मंत्रीपद काढून घेतलं जाऊ शकतं मात्र तसं झाल्यास रक्षा खडसे यांच्यावर पक्षाचे महत्त्वाचे देऊन पक्ष संघटनेची जबाबदारी त्यांना दिल्या जाऊ शकते. पण सध्या तरी याबाबत अनेक तर्कवितर्क हे वर्तवल्या जात असले तरी ॲड. उज्वल निकम यांच्या मंत्री पदाची चर्चा ही रक्षा खडसे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

Topics mentioned in this article