Israel Iran war: महाराष्ट्रातील बडा नेता दुबईत अडकला! युद्धाचा फटका; परतीचे मार्ग बंद

विमान सेवा बंद झाल्याने डॉक्टर कल्याण काळे दुबईत अडकल्याची माहिती असून दुबईतील ते एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना:

MP Kalyan Kale Stuck In Dubai:  अमेरिका- इस्त्राईल आणि इराणमध्ये युद्धाचा वणवा पेटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या देशांमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरु असून जगभरात याचा फटका बसताना दिसत आहे. इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील वाढलेल्या संघर्षाचा फटका परदेशात गेलेल्या भारतीयांना बसला आहे. दुबईतील विमान उड्डाणे स्थगित झाल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून मदतीसाठी विनंती करत आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळेही दुबईत अडकल्याची माहिती समोर आली आहे. 

जालन्याचे खासदार दुबईत अडकले!

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आखाती देशांतील युद्धसदृश परिस्थितीमुळे यूएईमध्ये विमानसेवा बंद असल्याने जालन्यातील सात नागरिक तिथे अडकले आहेत. पाच जण दुबईत तर दोन जण अबूधाबीत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली आहे.तर आता जालन्याच्या खासदार डॉक्टर कल्याण काळे हीच दुबईत अडकल्याची माहिती समोर आलेली आहे. 

Advertisement

Mahesh Landge: "हात धडापासून वेगळे करु, डोळे काढू", आमदार महेश लांडगेंचं वक्तव्य; मढी यात्रेवरुन इशारा

डॉक्टर कल्याण काळे कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी दिल्लीवरून दुबईला गेले होते अशी माहिती समोर आली आहे.  कल्याण काळे दुबई सुखरूप असल्याची माहिती ही डॉक्टर कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिली आहे. विमान सेवा बंद झाल्याने डॉक्टर कल्याण काळे दुबईत अडकल्याची माहिती असून दुबईतील ते एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, नागपूरो उमराह यात्रेसाठी मक्का-मदीना येथे गेलेले राज्यातील हजारो यात्रेकरू आखाती देशात अडकून पडले असल्याने त्यांना भारतात परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाने दिली आहे. एकट्या नागपूरमधील सुमारे २२०० लोक सध्या आखाती देशांतील विमानसेवेतील अडचणींमुळे अडकले असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्रातून जवळपास ५०,००० लोक उमराह यात्रेसाठी गेले असल्याची माहितीही प्यारे खान यांनी दिली. या संदर्भात सर्व ट्रॅव्हल एजंटना पत्र लिहून यात्रेला गेलेल्या लोकांची नावे मागवण्यात आल्याचेही प्यारे खान म्हणाले.

Artificial Flowers: लग्नकार्यात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर केल्यास होणार कारवाई; CM फडणवीसांची घोषणा

Topics mentioned in this article