Apple BKC Store Fight: आयफोनसाठी आयमाय काढली, बीकेसीत राडा; पाहा VIDEO

Fight At Mumbai's BKC Apple Store Viral Video: अ‍ॅपल स्टोअरबाहेर गर्दीच्या वेळी काही लोकांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai's BKC Apple Store Fight Video: आयफोनची 17 (Iphone 17 Series) सीरीज लाँच झाली असून हे नवे मॉडेल खरेदी करण्यासाठी तरुणाईची अक्षरशः झुंबड उडाली आहे. नवी सिरीज खरेदी करण्यासाठी आयफोनच्या स्टोअर बाहेर भल्या पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. आज मुंबईतील  बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टोरमध्येही आयफोन १७ खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. (BKC Apple Store Viral Video)

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयफोन 17 सिरीज खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये तरुणाईचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बीकेसी कुर्ला कॉम्प्लेक्स (Mumbai BKC Kurla Complex) स्टोरबाहेर हजारो तरुण- तरुणींनी गर्दी केली आहे. यावेळी सुरक्षा रक्षक आणि काही तरुणांमध्ये जोरदार राडा झाला.  मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमधील अ‍ॅपल स्टोअरबाहेर गर्दीच्या वेळी काही लोकांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.