'लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखं महाराजांची नाहीत', इतिहास संशोधकाचा खळबळजनक दावा

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं राज्य सरकार लंडनमधून आणणार आहे. ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी


छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं राज्य सरकार लंडनमधून आणणार आहे. मात्र याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळतंय. ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय. सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. सरकार भाडेतत्त्वावर लंडनमधून वाघनखे आणत आहे. मूळ वाघ नखं साताऱ्यात असतानाही सरकार भाडेतत्त्वावर आणण्याचा अट्टाहास का करत आहे? असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथे असणाऱ्या वेगवेगळ्या वाघ नखांपैकी एक वाघनख राज्य सरकार भारतात आणत आहे. तीन वर्षांकरिता ही वाघनखं भाडेतत्त्वावर आणल्या जात आहेत. मात्र मूळ वाघनखं  महाराष्ट्रात असतानाही सरकार विनाकारण खर्च करण्याचा अट्टाहास का करत आहे असा सवाल सावंत यांनी केला.सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचं वारंवार सांगितलं आहे. त्या संदर्भातला सरकारनं निर्णय देखील जारी केलेला आहे. मात्र या वाघनखं मूळ  वाघनखं नाहीत असा सावंत यांचा दावा आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मूळ वाघनखं  साताऱ्यात

महाराजांच्या मूळ वाघनखं या सातारा येथील राजघराण्याकडे असल्याचही सावंत यांनी सांगितला आहे. त्यामुळे सरकार आणत असलेली ही वागणके छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, त्याबाबत माझ्याकडं पुरावे असल्याचं सावंत यांनी ठामपणे सांगितलं. पुरातत्व संचलनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्दी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना याबाबत पत्रव्यवहार देखील केलेला आहे. याच आशियाचे पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवलं आहे.गंभीर विषयाबाबत सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केलं. 

( नक्की वाचा : दिल्लीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी का सुरु झाली आहे? )
 

इंद्रजीत सावंत यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून या वाघनखं संदर्भात माहिती मागवली. म्युझियमकडे ही वागनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याबाबत कोणताही पुरावा नसल्याचं सावंत यांनी सांगितलेला आहे. भारी आहे तत्वावर वाघ नखे आणण्यासंबंधीच्या सामंजस्य करार करतेवेळी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला ही माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली होती. मात्र शासनाने आणि संबंधित अधिकारी यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती जनतेपासून लपवून ठेवले असल्याचं सावंत यांनी म्हटल आहे. शिवप्रेमींची दिशाभूल करण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. 

Advertisement

 करोडो रुपयांच्या निधीचा चुराडा

या वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी शासन करोडो रुपयांच्या निधीची उधळपट्टी करणार आहे. हे संपूर्ण कामाची जबाबदारी तेजस गर्गे यांच्या निरीक्षणाखाली सुरू होती. मात्र गर्दी  लाच घेतल्यामुळे मे महिन्यापासून निलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सध्या सुरू आहे. ही संपूर्ण परिस्थिती पाहता शिवप्रेमींची फसवणूक सुरू असल्याचं सावंत यावेळी म्हणाले.