Beed News: वाल्मीक कराडला जेलमध्येही VIP ट्रीटमेंट? स्पेशल चहा, 6 ब्लॅकेंट्स अन् चिकनची मेजवाणी

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कारागृहातही व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याने केला आहे. प्रत्येक बुधवार व रविवारी चिकन दिले जात असल्याचा दावा कासले यांनी केला आहे. आपण जेलमध्ये असल्यावर हे सर्व पाहिल्याचेही कासलेंनी म्हटले आहे. रणजित कासलेच्या या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीनावर सुटका झाल्यानंतर रणजित कासलेने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत वाल्मीक कराडबाबत धक्कादायक दावे केले आहेत. जेलमध्ये वाल्मीक कराडला कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला आहे.

जेलमध्ये वाल्मीक कराडला स्पेशल चहा दिला जातो. त्याला तीन लेअरच्या खास चपात्या दिल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे वाल्मीक कराड स्वत:सह इतर कैद्यांच्या नावावर 25000 हजाराची कॅन्टीन खरेदी करतो. कारागृहातील इतर कैद्यांना पांघरायला कपडे असतात तर वाल्मीकला मात्र 6 ब्लॅकेंट्स दिले जातात. तसेच, प्रत्येक बुधवार व रविवारी चिकन दिले जात असल्याचा दावा कासलेने केला आहे.

नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात

दरम्यान, वाल्मीकला बीडच्या जेलमध्ये सर्व सुविधा आहेत. त्याला नागपूर, पुण्याच्या जेलमध्ये हलवा. अंजली दमानिया, करुणा मुंडे, तृप्ती देसाई यांना आपली विनंती आहे. मी तर मागणी केलीच, पण त्यांनीही करावी. वाल्मीकला बीडच्या जेलमध्ये ठेवूच नका, त्याच्या जिवाला धोका असल्याचेही  कासलेंनी म्हटले आहे.

Advertisement