Wari History: वारी म्हणजे काय? वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? जाणून घ्या रंजक इतिहास

आषाढी एकादशी ही सगळ्या एकादशींपैकी मोठी एकादशी मानली जाते. ऐवढेच नाही तर तिला आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या अधिष्ठान ही आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • आषाढी एकादशीला लाखो वारकरी वारीत सहभागी झाले असून ते पंढरपूरच्या दिशेने जात आहेत
  • वारी ही महाराष्ट्रातील सातशे वर्षांहून अधिक जुनी धार्मिक व सांस्कृतिक यात्रा आहे
  • वारकरी म्हणजे वारीत सहभागी होणारे लोक जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सध्या वारी सुरू आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. आषाढी एकादशीला हे सर्व जण पांडुरंगाच्या चरणा जवळ असतील. वारी ही महाराष्ट्राती संस्कृती आहे. अशात वारी म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. शिवाय वारकरी नक्की कोणाला म्हणायचं अशी ही विचारणा होता. त्या मागे काही इतिहास आहे का? तोच आपण जाणून घेणार आहोत. त्यातून वारी आणि वारकरी याचा अर्थ ही आपण समजून घेणार आहोत.  

वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतीक वारसाची ओळख आहे. हीच वारी वारकरी संप्रदायासाठी अतिशय महत्वाची यात्रा आहे. या वारीला एक दोन नाही तर तब्बल 700 वर्षाहून ही अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. वारीत मग ती आषाढी वारी असो की कार्तिकी वारी असो राज्यातले लाखो वारकरी पायी पंढरपूर पर्यंत जातात. तिथे विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि आपली वारी पूर्ण करतात. ज्या क्षणी पंढरपूरात विठ्ठलाचं दर्शन होतं त्यावेळी त्या वारकऱ्याची वारी पूर्ण होते. विठ्ठलाला  विष्णू आणि श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. ही वारी फक्त धार्मिक नसून भक्ती, श्रद्धा, समानता आणि एकतेचं प्रतीक मानली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणताही जाती-भेद न करता प्रत्येक व्यक्ती या वारीत सहभागी होतो. 

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा

आषाढी एकादशी ही सगळ्या एकादशींपैकी मोठी एकादशी मानली जाते. ऐवढेच नाही तर तिला आध्यात्मिक आणि  धार्मिकदृष्ट्या अधिष्ठान ही आहे. त्यामुळे ही एकादशी महत्त्वाची आहे. दरवर्षी याच एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. तिथे विठ्ठलाचं दर्शन घेतात. ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. 'वारी' म्हणजे एका ठराविक वेळी नियमितपणे केलेली,  सतत घडत असलेली एखादी गोष्ट. किंवा एका ठराविक वेळी नियमितपणे देवदर्शनासाठी जाण्याची परंपरा. त्यामुळे दरवर्षी श्रद्धेने भक्तिभावाने पंढरपूरला जाणाऱ्या या यात्रेला वारी असं म्हटलं जातं.

नक्की वाचा - Ashadhi Wari: आळंदी ते पंढरपूर, माऊलींसाठी रांगोळीच्या पायघड्या! 15 वर्षापासून सेवा करणारी तरुणी

मग वारकरी म्हणजे काय? तर वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे 'वारकरी'. हे वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात. या वारीच्यादरम्यान ते टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग गातात. विठ्ठलाचं नामस्मरण करतात. भक्तीभावाने मजल दर मजर पंढरीच्या दिशेने चालत पुढे जातात. याच वारीत रिंगण, फुगडी, कीर्तन आणि भजन यांसारख्या पारंपरिक गोष्टी ही तुम्हाला पाहायला भेटतात. त्याला ही भक्तीची किनार असते. या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. ही वारी आता जगभरात पोहोचली आहे. वारी पाहण्यासाठी पर्यटक ही येतात. त्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय जगाला होता आहे.