Lonar Lake: जे कधीच घडलं नव्हतं ते पहिल्यांदाच घडलं!, जगप्रसिद्ध लोणार सरोवराचं रहस्य पुन्हा एकदा वाढलं

रामायणातही याचा उल्लेख असलेल्या या पुरातन सरोवराचे जतन आवश्यक आहे अशी मागणी होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड वाढ होत आहे
  • कमळजा देवीचे मंदिर, जे कधीही पाण्याखाली नव्हते, सध्या सरोवरात सुमारे पंधरा फूट पाण्याखाली बुडाले आहे
  • लोणार सरोवर हे पर्यटक आणि वैज्ञानिकांसाठी महत्त्वाचे केंद्र असून विदेशी संशोधक अभ्यासासाठी येथे नियमित येतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बुलडाणा:

अमोल सराफ 

जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात कमळजा देवीचे मंदिर आता 15 फूट पाण्यात बुडाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पाणी वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. लोणार सरोवर हे पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र आहे. येथे विदेशी पर्यटक आणि संशोधक अभ्यासासाठी येतात. मात्र, खाऱ्या पाण्यात माशांचा उदय झाला होता, त्यावर चर्चा झाली. आता चारही बाजूंनी असंख्य हेमाडपंथी मंदिरे असलेल्या या सरोवरात पाण्याची पातळी का वाढत आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. कमळजा देवीचे मंदिर, जे कधीच पाण्याखाली गेले नव्हते, आता पूर्णपणे बुडाले आहे.

नक्की वाचा - Buldhana News: 'मी जिवंत आहे', वृद्ध आईची आर्त हाक, पण पोटच्या गोळ्याने केला घात, चक्क जन्मदात्या आईसोबतच...

गेल्या सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. असं सरोवर अभ्यासक सचिन कापूरे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. या निर्माण झालेल्या कुतूहलाबाबत पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन निष्कर्ष काढावा अशी मागणी निसर्ग प्रेमी श्रीकांत भुसारी यांनी केलीय. जिल्ह्यातील सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही या बदलामुळे आश्चर्यचकीत झाले आहेत. रामायणातही याचा उल्लेख असलेल्या या पुरातन सरोवराचे जतन आवश्यक आहे असं जेष्ठ नागरिक  किशोर कुलकर्णी यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Latur News: पैशाची हाव, हत्येचा बनाव! एक चुक नडली अन् भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश

सरोवराच्या पाण्याची पातळी का वाढत आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विश्वप्रसिद्ध असलेल्या या सरोवराच्या अभ्यासासाठी परदेशातून असंख्य पर्यटक आणि वैज्ञानिक येतात. पण खऱ्या पाण्याच्या या सरोवरात मासे का मिळत आहेत, पाण्याची पातळी का आणि कुठून वाढत आहे, हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या संवेदनशील विषयावर सखोल संशोधन करण्याची तीव्र गरज आहे. मात्र, संबंधित पुरातत्व विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब आहे.

Advertisement