वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारत उद्घाटन तसेच पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ सदनिकांचा चावी वाटप सोहळा आज पार पडला. माटुंगा यशवंत मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ म्हणजे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं, असे म्हणत धारावी पुनर्विकासाचे कामही हाती घेतल्याची माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे. तुमच्या सर्वांच्या स्वप्नात आम्ही पाहिलं होतं. आज ते पूर्ण झाले. बीडीडी चाळीने अनेक सामाजिक आंदोलने बघितली. स्वातंत्र्यांची चळवळ बघितली. या १०० वर्षांमध्ये बीडीडी चाळीचा इतिहास पाहिला तर या चाळीच्या भिंतीमध्ये अनेक कहाण्या आहेत. अनेकांचे दुःख दडलेले पाहायला मिळतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
'बीडीडी चाळींप्रमाणे धारावीचे स्वप्न महायुती सरकारच पूर्ण करणार', अजित पवारांंचं मोठं आश्वासन
"सातत्याने बीडीडी चाळीचा विकास झाला पाहिजे, अशी मागणी वारंवार होत होती. काही लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा मी पाहिलं की लोक कशा अवस्थेत राहत आहेत. मला असं वाटलं की म्हणायला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा वाईट अवस्था होती. म्हणूनच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार आले तेव्हा बीडीडी चाळीचा मुद्दा पहिल्यांदा ऐरणीवर घेतला. यामध्ये अनेक अडचणी आल्या," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मला सांगताना आनंद वाटतो आपण जर त्याठिकाणी जबाबदारी घेत आहोत तर त्याचे ग्लोबल टेंडर काढले. वरळीमध्ये टाटा, एलएनटीने हे काम घेतले. अतिशय चांगले स्पेसिफिकेशन यामध्ये टाकले. २२ एप्रिल रोजी सर्व टेंडर काढून त्याचे भूमिपूजन केले होते. त्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्व अडचणींवर मात काढत अत्यंत वेगाने आपण या कामाला सुरुवात केली आणि आज लोकांना घरे दिली."
(नक्की वाचा- NDTVच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात)
"हा प्रकल्प करताना अनेकांनी मदत केली, हातभार लावला. आमच्या महायुती सरकारचे नेहमीच समाजासाठी आठमुठी भूमिका घ्यायची नाही, असं धोरण राहिलेलं आहे. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं जे पोलिसांना स्वप्न मिळालं पाहिजे, हे स्वप्न होतं ते पूर्ण झाले याचा आनंद होत आहे. अवघ्या १५ लाखात पोलिसबांधवांना घर मिळाले. वरळीमध्ये ९ हजार आणि एकूण १४, ००० घर देणार अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.