वजन कमी करण्यासाठी 5 गोष्टींचा करा आहारात समावेश
हेल्दी आणि फिट राहणं प्रत्येकालाच आवडतं. धावपळीच्या सध्याच्या युगात चुकीचं लाईफ स्टाईल आणि खाण्यानं अनेकांचं वजन वाढतं. एकदा वजन वाढलं की ते नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. तुमच्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्ही डाएटवर लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्ट तसंच डिनरमध्ये हेल्दी आणि लाईट पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामधील काही सोप्या पदार्थांबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
-
वजन कमी करण्यासाठी सालाड हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डिनरमघ्ये सालाडचा समावेश नक्की करा.
-
खिचडी हा प्रत्येक घरोघरी केला जाणारा पदार्थ आहे. वजन कमी करण्यासाठी डिनरमध्ये हेल्दी आणि लाईट पर्याय म्हणून तुम्ही खिचडी खाऊ शकता.
-
तुम्ही शेवायची खिर किंवा शेवायचे गोड पदार्थ खाल्ले असतील. फिट राहण्यासाठी शेवायची खिचडी देखील बेस्ट आहे.
-
इडली दक्षिणात्य पदार्थ असला तरी आपल्याकडं घरोघरी केला जातो. अनेक हॉटेलमध्येही सहज मिळते. सर्वत्र लोकप्रिय असलेली इडली देखील हेल्दी पदार्थ आहे. तुम्ही ब्रेकफास्ट आणि डिनरसाठी इडली खाऊ शकता.
-
जेवणापूर्वी गरम-गरम सूप पिण्याची मजा काही औरच आहे. तब्येतीसाठीही सूप फायदेशीर आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डिनरमध्ये सूपचा समावेश नक्की करा.
Advertisement
Advertisement