अभी तो मैं जवान हूँ! वयाच्या 60व्या वर्षी सौंदर्य स्पर्धा जिंकून रचला इतिहास
अॅलेझेंड्रा मरिसा रॉड्रिग्ज (Alejandra Marisa Rodriguez) या आता मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत आहे.
-
अर्जेंटिनातील 60 वर्षीय अॅलेझेंड्रा मरिसा रॉड्रिग्ज यांनी मिस युनिव्हर्स ब्युनस आयर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. पेशाने त्या वकील आहेत. (इन्स्टाग्राम)
-
अॅलेझेंड्रा मरिसा रॉड्रिग्ज या ब्युनस आयर्स प्रांताची राजधानी ला प्लाटा येथील रहिवासी आहेत आणि आता त्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवण्यासाठी तयारी करत आहेत. (इंस्टाग्राम)
-
गेल्या वर्षी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने यापुढील स्पर्धांसाठी वयोमर्यादा नसल्याची घोषणा केल्याने अॅलेझेंड्रा यांना आता या स्पर्धेमध्ये सहभागी होणे शक्य झाले आहे. (इंस्टाग्राम)
-
मिस ब्युनस आयर्स स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर अॅलेझेंड्रा यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. (इंस्टाग्राम)
-
अॅलेझेंड्रा यांच्या लुक-वयाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. (इंस्टाग्राम)
-
अॅलेझेंड्रा यांनी स्पर्धेदरम्यान आपल्या लुकचे सीक्रेट शेअर केले. आठवड्यातून तीन वेळा वर्कआऊट करणे, फास्टिंग करणे आणि त्वचेसाठी चांगल्या क्रीम वापरणे; हे त्यांच्या यंग लुकचे सीक्रेट आहे. (इंस्टाग्राम)
-
मे 2024 मध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स अर्जेंटिना स्पर्धेसाठी त्या तयारी करत आहेत. याची माहिती देणारा व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून त्यांचा निश्चय किती पक्का आहे, हे दिसून येते. (इंस्टाग्राम)
-
निवड प्रक्रियेमध्ये त्या पात्र ठरल्यास 28 सप्टेंबर 2024 रोजी मेक्सिकोमध्ये पार पडणाऱ्या मिस युनिव्हर्स वर्ल्ड स्पर्धेमध्ये अॅलेझेंड्रा अर्जेंटिनाचा ध्वज जागतिक मंचावर फडकावतील. (इंस्टाग्राम)
Advertisement
Advertisement
Advertisement