जाहिरात

अमित शाहांनी अचानक प्लॅन बदलला, सागर बंगल्याऐवजी पहिले 'वर्षा'वर पोहोचले, नेमके काय घडले ?

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले असताना अजित पवार मात्र त्यांच्यासोबत दिसून आले नाहीत.

  • भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 8 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. दौऱ्यामध्ये अमित शाह यांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • अमित शाह यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले.
  • अमित शाह यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्यात अचानक बदल केला आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्याऐवजी आधी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले.
  • अमित शाह यांनी हा बदल करून एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून या नात्याने त्यांच्या घरच्या गणपतीचे पहिले दर्शन घेतले पाहिजे, हा एक सुप्त संदेश तर आहेच शिवाय एकनाथ शिंदे यांचे वजनही देवेंद्र फडणवीसांसमान आहे हे देखील दाखवण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
  • गणपती दर्शनानंतर अमित शाह यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये जागावाटप आणि निवडणूक प्रचाराबाबत काही निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.