iPhone 16 सीरिजसाठी Apple चा ट्रेड इन प्रोग्राम माहिती आहे का?
मुंबई, महाराष्ट्रासह देशात iPhone 16 विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आयफोन विकत घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
Apple ने iPhone 16 सीरिज बाजारात आणली आहे. यामध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max या मॉडेलचा समावेश आहे. तुम्हीही जर iPhone 16 विकत घेण्याचा विचार करत असाल तर अॅपलच्या ट्रेड इन प्रोग्रामबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या पैशांची मोठी बचत होईल.
-
Apple iPhone 16 ची किंमत (128GB बेस मॉडेल) ही 79 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. आयफोन महाग असल्याने सध्याच्या आयफोन धारकांसाठी मोबाइल निर्माता कंपनीने एक अपग्रेड प्रोग्राम उपलब्ध करून दिला आहे. जुना आयफोन देऊन त्या बदल्यात ग्राहकांना ठराविक रक्कम क्रेडिट म्हणून दिली जाते. ती रक्कम iPhone 16 च्या तुम्ही निवडलेल्या मॉडेलच्या किंमतीतून वजा केली जाते. या सवलतीला ट्रेड इन प्रोग्राम असे म्हटले आहे.
-
आपण एक उदाहरण पाहुया, 128GB चा iPhone 15 जेव्हा बाजारात आला होता तेव्हा त्याची किंमत 79 हजार 900 रुपये इतकी होती. जर तुम्ही हा फोन देऊन 128GB चा iPhone 16 घेणार असाल तर तुम्हाला जुन्या 128GB चा iPhone 15 साठी 37,900 रुपयांपर्यंत क्रेडिट दिले जाईल. ही रक्कम iPhone 16 च्या किंमतीतून वजा केली जाईल.
-
तुमच्याकडे 128 GB चा iPhone 14 असेल तर तुम्हाला या मोबाइल फोनच्या बदल्यात 32 हजार100 रुपयांपर्यंत क्रेडिट मिळेल. मग iPhone 13 आणि iPhone 12 धारकांचे काय होणार ?
-
iPhone 13 आणि iPhone 12 धारकांनाही या प्रोग्राममध्ये सहभागी होता येईल. iPhone 12 साठी 20 हजार 800 आणि iPhone 13 साठी 31 हजार रुपयांपर्यंत क्रेडिट मिळवता येणे शक्य आहे.
-
या ट्रेड इन प्रोग्रामसाठीच्या फोनच्या स्थितीवर त्याची किंमत ठरवली जाईल. जितका सुस्थितीतील फोन असेल त्याला तितकी चांगली किंमत मिळेल.
Advertisement
Advertisement