जाहिरात

Ashadhi Ekadashi 2024 CM एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठ्ठलाची केली महापूजा

Ashadhi Ekadashi 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली.

  • पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बुधवारी (17 जुलै) पहाटे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तिसऱ्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांचे वडील ,स्वतः मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे पुत्र रुद्रांश अशा शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी एकत्रित विठ्ठलाची पूजा केली.
  • यंदा नाशिकमधील दाम्पत्य बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे यांना पूजेचा बहुमान मिळाला.
  • महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
  • राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, पाऊस पडू दे, असे साकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातले. तसेच पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी टोकन व्यवस्था करण्यासाठी 103 कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही यावेळेस त्यांनी केली.
Switch To Dark/Light Mode
;