जाहिरात

2021 साली पराक्रम गाजवणारे क्रिकेटर सध्या काय करतात ?

2021 साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला गॅबाच्या मैदानावर पराभूत करत क्रिकेटविश्वात जबरदस्त खळबळ उडवून दिली होती. या ऐतिहासिक विजयात मोलाची भूमिका बजावणारे 11 क्रिकेटर सध्या काय करतायत ते पाहूया.

  • 2021 च्या ऐतिहासिक गॅबा कसोटी सामन्यात रोहित शर्मा सलामीला आला होता. रोहित तेव्हा सगळ्या फॉरमॅटसाठीचा कर्णधार झाला होता. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका सुरू असून, रोहित भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.
  • गॅबावर झालेल्या या सामन्यात शुभमन गिल याने आव्हानाचा पाठलाग करताना 91 धावांची खेळी खेळली होती. गिल याने तिसऱ्या क्रमांकाचे आपले स्थान अधिकच बळकट केले आहे.
  • 2021 साली झालेल्या कसोटी सामन्यात अत्यंत चिवट, झुंजार खेळी खेळणारा चेतेश्वर पुजारा आता क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत शिरला आहे.
  • ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने रोहित, विराट यासारखे प्रमुख खेळाडू नसतानाही प्रचंड मोठा विजय मिळवला होता. या दोघांच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधार बनला होता. अजिंक्यचे कसोटी संघातील स्थान डळमळीत झाले आहे मात्र तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अजूनही खोऱ्याने धावा करतो आहे.
  • 2021 ची गॅबा कसोटी खऱ्या अर्थाने गाजवली होती ती रिषभ पंत याने. विकेटकिपरची भूमिका चोख बजावणाऱ्या रिषभने संघ संकटात असताना आपल्या अफलातून बॅटींगने अशक्यप्राय विजयही खेचून आणले आहे. गॅबा कसोटी त्यापैकीच एक आहे.
  • मयांक अग्रवाल याला आता भारतीय संघात स्थान नाहीये. मार्च 2022 नंतर तो आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाहीये. 2025 च्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावामध्ये ते अनसोल्ड राहिला.
  • गौतम गंभीर संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा संघात स्थान मिळाले. सुंदर हा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थमधल्या पहिल्या विजयी कसोटीसंघाचा तो भाग होता.
  • अष्टपैलू शार्दूल ठाकूर हा देखील 2025 च्या आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला आहे. 2023 साली जागतिक कसोटी चॅम्पिअनशिपसाठी झालेल्या कसोटी सामन्यानंतर शार्दूलला पुन्हा संधी मिळालेली नाही.
  • 2020/2021 च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत नवदीप सैनीने कमाल केली होती. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या संघात तो राखीव खेळाडू म्हणून गेला आहे.
  • मोहम्मद सिराज हा 2021 सालच्या कसोटी संघाचाही भाग होता आणि सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या कसोटी संघाचाही भाग आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये ट्रॅव्हीस हेडसोबत त्याने हुज्जत घातली होती ज्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
  • गॅबावर 2021 साली झालेल्या कसोटी सामन्यात टी.नटराजन खेळला होता. त्या दौऱ्यात तो हा एकमेव सामना खेळला होता. 2024 च्या आयपीएलमध्ये त्याने 19 विकेट घेतल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 10.75 कोटींची बोली लावली होती.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com