Balasaheb Thackeray Memorial: बाळासाहेब ठाकरे स्मारक कसे दिसते? पाहा पहिली झलक
प्रकल्पाच्या टप्पा 2 च्या कामासाठी मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली असून, टप्पा 2 मधील कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कंत्राटदाराची नेमणूकची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
-
पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे 180.99 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याअंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.