Balasaheb Thackeray Memorial: बाळासाहेब ठाकरे स्मारक कसे दिसते? पाहा पहिली झलक
प्रकल्पाच्या टप्पा 2 च्या कामासाठी मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली असून, टप्पा 2 मधील कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कंत्राटदाराची नेमणूकची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
-
मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्कासमोरील महापौर निवासामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे.
-
या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. महापौर निवासाचे संग्रहालयात रुपांतर करण्यात येत आहे.
-
स्मारकाचे प्रवेशव्दार इमारत, प्रशासकीय इमारत, आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पातील टप्पा १ च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराची तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती.
-
पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे 180.99 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याअंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
-
दुसऱ्या टप्प्यामध्ये भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन, महापौर निवासस्थान इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी विविध छायाचित्रे, दृष्यचित्रे, आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाणार आहे.
-
दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेवांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक यांचा समावेश असेल.
Advertisement
Advertisement