बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, झिंक, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी6 आणि सेलेनियम या पोषणतत्त्वांचा समावेश आहे आणि हे सर्व घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत.
धान्यांमध्ये लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बीसह बायोटिनचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अमिनो अॅसिडची (प्रोटीन) निर्मिती होण्यास मदत मिळते.