जाहिरात

Delhi Stampede : 19 प्रवाशांच्या मृत्यूआधी दिल्ली रेल्वे स्थानकात काय होती स्थिती? थरकाप उडवणारे PHOTO

महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावर मोठी गर्दी जमा झाली होती. पाहता पाहता चेंगराचेंगरी झाली आणि एकच हलकल्लोळ उडाला.

  • नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि 16 वर मोठी गर्दी जमा झाली आणि यात झालेल्या चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना घडली आहे.
  • या अपघातात तीन मुलांसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 10 जण जखमी आहेत.
  • एकाएकी झालेल्या गर्दीतून ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, पटनाकडे जाणारी रेल्वे प्लॅटफॉर्म 14 वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म 15 वर उभी होती.
  • प्रवासी फूट ओव्हर ब्रिजवर बसले होते, त्याचवेळी सर्वजण प्लॅटफॉर्म 15 कडे निघाले.
  • दरम्यान एक व्यक्ती घसरून खाली पडली आणि त्यामुळे संपूर्ण गर्दीत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, अशी माहिती आहे.
  • याबाबत उच्च सदस्य समितीद्वारे चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सीपीआरओंकडून देण्यात आली आहे.
  • त्यात प्रयागराजला जाणारी ट्रेन उशीराने धावत होती. त्यामुळे फूटओव्हर पुलावर मोठी गर्दी जमा झाली.
  • काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, तेथे रेल्वे पोलीस उपस्थित होते मात्र इतकी गर्दी होती की तेही काहीच करू शकले नाही.
  • मृतांमध्ये 9 जणं बिहार, 9 हरियाणा आणि एक प्रवासी दिल्लीतील असल्याची माहिती आहे.
  • गराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना 10 लाख, गंभीर जखमी झालेल्यांना 2.5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना एक लाख निधी दिला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
  • फूटओव्हर पुलावरुन खाली उतरत असताना चेंगराचेंगरी झाली आणि यात 19 जणांचा मृत्यू झाला.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com