वयाच्या 15 साली लग्न, 17 मध्ये एका बाळाची आई झाली होती ही टॉप अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री मोसमी चॅटर्जी हिने आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. मोसमी आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत होती.
-
मोसमी चॅटर्जी 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. वयाच्या दहाव्या वर्षीपासून मोसमीने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. फोटो: Instagram/@filmhistorypics
-
मोसमी चॅटर्जीचं लग्न संगीत दिग्दर्शक आणि गायक हेमंत कुमार यांचे सुपूत्र जयंत मुखर्जी यांच्यासोबत झालं होतं. वयाच्या 15 व्या वर्षी मोसमी लग्नाच्या बंधनात अडकली होती. फोटो: Instagram/@filmhistorypics
-
वयाच्या 17 व्या वर्षी मोसमी चॅटर्जी एका बाळाची आई झाली होती. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर Lehren ला दिलेल्या एका मुलाखतीत मोसमीने सांगितलं होतं, मी त्यावेळी दहावीत होते. हेमंत कुमार आमच्या खूप जवळ आले होते. फोटो: Instagram/@filmhistorypics
-
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, सर्वजण मला बालिका वधू बनवण्याचा प्रयत्न करीत होते. ही आयडिला माझ्या सासूला आली होती आणि सासऱ्यांच्याही हे लक्षात आलं होतं. ते माझ्या वडिलांजवळ गेले आणि ही मुलगी आमची सून असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमचा साखरपुडाही झाला. फोटो: Instagram/@filmhistorypics
-
त्यांनी सांगितलं की, माझ्या मोठ्या मावशीला कॅन्सर होता. त्यांना माझं लग्न पाहण्याची इच्छा होती. ही बाब त्यांनी माझ्या सासऱ्यांना सांगितली. त्यानंतर लगेच एप्रिल महिन्यात माझी परीक्षा होती आणि मार्च महिन्यात माझं लग्न झालं. त्यानंतर सासऱ्यांनी मला परीक्षा देण्याची इच्छा आहे का असं विचारलं, मात्र मी नकार दिला. फोटो: Instagram/@filmhistorypics
-
मी वयाच्या 17 व्या वर्षी आई झाली होती. त्याचवेळी मला चित्रपटही मिळाला होता. माझ्याजवळ मर्सिडीज होती. स्क्रिनवर पाहून मलाही खूप आनंद होत होता. फोटो: Instagram/@filmhistorypics
-
मोसमी चॅटर्जी सर्वात पहिल्यांदा 1967 च्या बंगाली चित्रपटात बालिका वधूमध्ये दिसली होती. तिचा पहिला हिंदी चित्रपट अनुराग आहे. फोटो: Instagram/@filmhistorypics
Advertisement
Advertisement
Advertisement