आरशात स्वतःला पाहून भावुक का झाले अमिताभ बच्चन?
बिग बी अमिताभ बच्चन यांनी दोन फोन फोटो शेअर करून भावनिक पोस्ट लिहिली आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात तर दुसऱ्या फोटोमध्ये वर्तमान काळ दिसत आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की,'मी जेव्हा आरशात पाहिले, तेव्हा मला धक्काच बसला. हा जो चेहरा मी आता पाहत आहे, तो काही वर्षांपूर्वी वेगळा होता. माझा चेहरा बदलत असतानाही चाहत्यांकडून मला खूप प्रेम आणि आपुलकी मिळत राहिली'.
-
अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहते त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर जमतात, पण एक दिवस कदाचित असे होणार नाही, कारण एक दिवस आयुष्याचा शेवट निश्चित आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की,"गणपतीचा उत्सव सुरू झाला आहे आणि गणपतीने आपणा सर्वांना शांती-सिद्धीच्या मार्गावर घेऊन जावे आणि जीवन आनंदाने व्यापून जावे. कारण आनंद अनंत आहे".
-
अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये लोक मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाले आहेत. कोणी गणेशमूर्तीसह त्यांचा फोटो घेऊन आले होते, कोणी ढोल वाजत होते तर कोणी त्यांच्या सिनेमांशी संबंधित फोटो घेऊन पोहोचले होते.
-
चाहत्यांचे इतके प्रेम पाहून अमिताभ स्वतःला रोखू शकले नाहीत. काही वेळासाठी ते घराच्या गेटवर आले आणि चाहत्यांची भेट घेतली.
-
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. कौन बनेगा करोडपती या त्यांचा कार्यक्रम देखील प्रचंड प्रसिद्ध आहे.
Advertisement
Advertisement