जाहिरात

मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल, प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

May 31, 2024 08:34 IST
  • ???? ?????????? ????? ????????? ?????????? ???????, ?????????????? ?????????????? ??? ????
    मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्सचे रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी (30 मे 2024) रात्रीपासून ते रविवारी (2 जून 2024) दुपारपर्यंत ठाण्यातील ब्लॉक सुरू असेल.
  • ???? ?????????? ????? ????????? ?????????? ???????, ?????????????? ?????????????? ??? ????
    शुक्रवारी (31 मे 2024) रात्रीपासून ते रविवारी ( 2 जून 2024) दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. या कालावधीत 74 रेल्वे गाड्या रद्द होणार असून 122 रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत.
  • ???? ?????????? ????? ????????? ?????????? ???????, ?????????????? ?????????????? ??? ????
    ब्लॉक काळामध्ये मध्य रेल्वेवरील (Central Railway) एकूण 930 लोकल फेऱ्या रद्द होतील. शनिवारच्या (1 जून) दिवशी सुटीकालीन वेळापत्रक चालवण्यात येईल.
  • ???? ?????????? ????? ????????? ?????????? ???????, ?????????????? ?????????????? ??? ????
    ब्लॉक 1 - ठाण्यामध्ये 63 तासांचा विशेष ब्लॉक ब्लॉक कालावधी - गुरुवारी (30 मे) मध्यरात्रीच्या 12.30 वाजेपासून ते रविवारी (2 जून) दुपारपर्यंत
  • ???? ?????????? ????? ????????? ?????????? ???????, ?????????????? ?????????????? ??? ????
    ब्लॉक 2 - सीएसएमटी येथे 36 तासांचा विशेष ब्लॉक ब्लॉकची कालावधी - शुक्रवार (31 मे) मध्यरात्रीच्या 12.30 वाजेपासून ते रविवार (2 जून) दुपारी 12.30 वाजेपर्यंत
  • ???? ?????????? ????? ????????? ?????????? ???????, ?????????????? ?????????????? ??? ????
    1. शुक्रवारी मध्य रेल्वेवरील 161 लोकल फेऱ्या रद्द 2. शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द आणि 613 लोकल अंशत: रद्द 3. रविवारी 235 लोकल फेऱ्या आणि 270 लोकल अंशत: रद्द 4. शुक्रवारी चार रेल्वेगाड्या रद्द आणि 11 रेल्वेगाड्या अंशत: रद्द 5. शनिवारी 37 रेल्वेगाड्या रद्द आणि 31 रेल्वेगाड्या अंशत: रद्द 6. रविवारी 31 रेल्वेगाड्या रद्द आणि 80 रेल्वेगाड्या अंशत: रद्द
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;