जाहिरात

भावा बहिणीमध्ये तिकिटासाठी चुरस, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

वर्ध्यात भावाच्या मतदार संघात बहिणीने उमेदवारी मागितली आहे. आमदार रणजित कांबळे यांची मावसबहीण चारुलता टोकस यांनी देवळी विधानसभातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलीय.

  • देवळी विधानसभा मतदरासंघासाठी उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाअंतर्गत चुरस वाढली आहे.
  • देवळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रणजित कांबळे हे 5 वेळा निवडून आले आहेत.
  • या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेत्या प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांनी प्रयत्न सुरू केलेत.
  • रणजित कांबळे हे चारुलता टोकस यांचे मावस भाऊ आहेत. देवळीतून उमेदवारीसाठी टोकस यांनी दावा केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
  • चारुलता टोकस यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. देवळी मतदारसंघात त्यांनी गेल्या तीन वर्षात मोर्चेबांधणी करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com