भावा बहिणीमध्ये तिकिटासाठी चुरस, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार
वर्ध्यात भावाच्या मतदार संघात बहिणीने उमेदवारी मागितली आहे. आमदार रणजित कांबळे यांची मावसबहीण चारुलता टोकस यांनी देवळी विधानसभातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलीय.
-
देवळी विधानसभा मतदरासंघासाठी उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाअंतर्गत चुरस वाढली आहे.
-
देवळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रणजित कांबळे हे 5 वेळा निवडून आले आहेत.
-
या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेत्या प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांनी प्रयत्न सुरू केलेत.
-
रणजित कांबळे हे चारुलता टोकस यांचे मावस भाऊ आहेत. देवळीतून उमेदवारीसाठी टोकस यांनी दावा केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
-
चारुलता टोकस यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. देवळी मतदारसंघात त्यांनी गेल्या तीन वर्षात मोर्चेबांधणी करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत.
Advertisement
Advertisement