Dharmaveer 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट... CM शिंदेंनी पोस्टर केले लाँच, या दिवशी रिलीज होणार सिनेमा
'धर्मवीर - 2'... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट... या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा रविवारी वर्षा निवासस्थानी पार पडला.
-
लाँच सोहळ्यास बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले.लाँच सोहळ्यास बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले.
-
सिनेमाच्या पोस्टवर "हिंदुत्त्वाशी गद्दारी केलेल्यांना क्षमा नाही" 'धर्मवीर - 2... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट...' अशी टॅगलाइन दिसत आहे.सिनेमाच्या पोस्टवर "हिंदुत्त्वाशी गद्दारी केलेल्यांना क्षमा नाही" 'धर्मवीर - 2... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट...' अशी टॅगलाइन दिसत आहे.
-
साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेल्या 'धर्मवीर-2' साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनातील पुढील गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेल्या 'धर्मवीर-2' साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनातील पुढील गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
आनंद दिघे यांची हिंदुत्त्ववादी भूमिका आणि त्यांना साथ देता देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ते ते राजकीय नेते म्हणून कसे घडले? हे या सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे.आनंद दिघे यांची हिंदुत्त्ववादी भूमिका आणि त्यांना साथ देता देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ते ते राजकीय नेते म्हणून कसे घडले? हे या सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे.
-
प्रविण विठ्ठल तरडे यांनी सिनेमाच्या कथा, पटकथा, संवाद लेखनासह दिग्दर्शनही केले आहे. (All Image Credit - Eknath Shinde Instagram)प्रविण विठ्ठल तरडे यांनी सिनेमाच्या कथा, पटकथा, संवाद लेखनासह दिग्दर्शनही केले आहे. (All Image Credit - Eknath Shinde Instagram)