जाहिरात

नांदेडच्या धर्माबादमध्ये वर्षाकाठी लाल मिरचीचा 200 कोटींचा व्यवहार

जेवणात तिखटाचे प्रमाण किती आहे यावर त्याची चव अवलंबून असते. त्यामुळेच आज बाजारात अनेक नामांकित कंपन्यांचे तिखट उपलब्ध आहे.

  • केवळ देशातच नव्हे तर विदेशातही नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील लाल मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
  • येथील बाजारपेठेत वर्षाकाठी तब्बल 200 कोटी रुपयांची उलाढाल ही केवळ लाल मिरची अन् मिरचीची पूड विकून होते.
  • धर्माबाद इथं गावरान, बेडगी, काश्मिरी डब्बी, तेजा, जिटी, सी 5, 273, सुपर टेन, अरमुर आणि वंडरहाट अशा 10 प्रकारची मिरची उपलब्ध असते.
  • विशेष म्हणजे भारतीय सैन्य दलात इथल्या मिरची अन् मिरचीच्या पावडरला विशेष मागणी आहे.
  • धर्माबाद इथं 12 मिरची पावडरचे कारखाने आहेत. यातून दोन हजार कामगारांना बारमाही रोजगार मिळतो.
  • भारतीय सैन्य दलात खास धर्माबाद येथील मिरची मागवली जाते. आखाती देशांतही इथल्या मिरचीला मागणी आहे. तेजा ही सर्वात तिखट असते तर काश्मिरी ही अत्यंत कमी तिखट असते.
  • पंचक्रोशीतील शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात अन् इथल्याच कारखान्यात त्याची पावडर बनवली जाते.
  • मौसमात इथे दिवसाला 300 टन मिरची उपलब्ध होते. इथ यायचं मिरची पसंद करायची अन् पावडर बनवून घेऊन जायचं किंवा थेट पावडर खरेदीची मुभा आहे.
  • इथं मिरची व्यवहारातून वर्षाकाठी 200 कोटी रुपयांची उलाढाल होते.
  • ही बाजारपेठ इथल्या व्यापाऱ्यांनी विकसित केली आहे. पण शासनाने इथं मिरची टेस्टिंग लॅब सुरू केली, तर विदेशात पाठवण्यासाठी मोठी मदत होईल यातून सर्वांचेच उत्पन्न वाढेल असे कारखानदार सांगतात.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com