जाहिरात

मुंबई, ठाण्यात दहीहंडीची धूम, सर्वात मोठं बक्षीस कोण पटकावणार?

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात दहीहंडीची मोठी धूम पाहायला मिळत आहे.

  • मागाठाणेतील तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली आणि एका गाण्यावर सादरीकरण केलं.
  • भाजपशी संबंधित स्वामी प्रतिष्ठानच्या शिवाजी पाटील यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी एकूण 50 लाखांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.
  • पहिल्यांदा नऊ पिरॅमिड करणाऱ्या गोविंदासाठी मनसेने 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
  • ठाण्याच्या कल्चरल यूथ फाऊंडेशनने दहीहंडीच्या निमित्ताने सर्वात मोठं पारितोषिक जाहीर केलं आहे. जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या गोविंदा समुहाला 25 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
  • यावेळी मुलींच्या गोविंदा पथकाचीही धूम पाहायला मिळाली.
  • महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात दहीहंडीची मोठी धूम पाहायला मिळत आहे.
  • शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे दहीहंडी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ओळखले जातात. त्यांनी ठाणे आणि मुंबईत दहीहंडीत जिंकणाऱ्यांना 11, 21 लाखांचं बक्षीस ठेवलं आहे.
  • महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडी कार्यक्रमादरम्यान छोट्या नाटुकल्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Switch To Dark/Light Mode