अजित पवारांनी आमदारांसह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, प्रचाराचा फोडला नारळ
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंगळवारी (9 जुलै 2024) मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी (9 जुलै 2024) फोडला.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांसह श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले.
-
"आजचा दिवस शुभ आहे, त्यामुळे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली आहे", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
-
आम्ही सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, तर बाप्पाने आम्हाला आशीर्वाद द्यावे, असे साकडे घातले. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आम्ही समोर जात आहोत. त्यासाठी आजच्या चांगल्या दिवसाने आम्ही सुरुवात केली आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
-
14 जुलैला बारामती येथे एका रॅलीचंही आयोजन करण्यात येत आहे, ज्यामध्ये पक्षाच्या भविष्यातील योजनांची घोषणा करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
-
अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, आमदार अनिल पाटील , कृषी मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील आणि पक्षातील अन्य नेत्यांसह त्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
-
पार्टी कार्यालयातून एका बसमधून हे सर्व मंदिर दर्शनासाठी आले होते.
-
विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांवर 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवारही मैदानामध्ये आहेत. ही निवडणूक 12 जुलैला होणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement