होमफोटोअजून काही डाऊट आहे? फडणवीस, शिंदेंबाबतच्या प्रश्नांवर भाजपच्या बड्या नेत्याने दिली मोठी बातमी
अजून काही डाऊट आहे? फडणवीस, शिंदेंबाबतच्या प्रश्नांवर भाजपच्या बड्या नेत्याने दिली मोठी बातमी
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला मात्र 3 डिसेंबरपर्यंत महायुतीचे राज्यात सरकार स्थापन झालेले नाही.
एकनाथ शिंदे हे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र शिवसेना महायुती कायम राहील तसेच सत्तेतही सहभागी होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील भाजपच्या एका बड्या नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, अजून काही डाऊट आहे का ?
भाजपच्या विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठीची बैठक 4 डिसेंबरला होणार आहे. केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.