अजून काही डाऊट आहे? फडणवीस, शिंदेंबाबतच्या प्रश्नांवर भाजपच्या बड्या नेत्याने दिली मोठी बातमी
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला मात्र 3 डिसेंबरपर्यंत महायुतीचे राज्यात सरकार स्थापन झालेले नाही.
-
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.
-
या सोहळ्यासाठीच्या तयारीचा महायुतीतील तीनही पक्षाच्या नेत्यांनी आढावा घेतला.
-
एकनाथ शिंदे हे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र शिवसेना महायुती कायम राहील तसेच सत्तेतही सहभागी होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
-
दिल्लीतील भाजपच्या एका बड्या नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, अजून काही डाऊट आहे का ?
-
भाजपच्या विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठीची बैठक 4 डिसेंबरला होणार आहे. केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
Advertisement
Advertisement